Summary of the Book
स्वामित्वाच्या भावनेतून आणि ईर्षेतून राजा, राज्य, राज्यसंस्था या संकल्पना विकसित होत गेल्या. चौथ्या खंडाचा राज्यशास्त्र हा प्रमुख विषय. अर्थात इतर विषयांनीही इथं हजेरी लावली आहेच. राज्यशास्त्राच्या अनेक लेखांचा प्रामुख्याने समावेश असलेल्या या खंडात समाजशास्त्रविषयक नोंदीही आहेत. शिवाय महादेव गोविंद रानडे, रमाबाई रानडे, राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर, शाहूमहाराज या भारतीय विचारवंतांबरोबर पाश्च्यात्य विचारवंतांचाही परिचय या खंडात करून देण्यात आला आहे. या खंडातील प्रमुख नोंदी पुढीलप्रमाणे आहेत- रसेल बट्रार्ड, राजकीय तत्त्वज्ञान, राजकीय दबावगट, राजकीय पक्ष, राजकीय संस्कृती, राजकीय सिद्धांत, राज्य, राज्यघटना, रानडे महादेव गोविंद, रॉय मानवेंद्रनाथ, राष्ट्रवाद, राष्ट्रीयीकरण, रिकार्डो, लास्की, ल्युथर मार्टिन, लोककथा-लोकगीते, लोकप्रासन, लोकपाल व लोकायुक्त, लोकाही, लोकसंख्या, वर्ग-सामाजिक, वसाहतवाद, वॉलरस लिआँ, व्याज, व्यापार, विवाहसंस्था, वृद्धापकाळ, विषमता, शासन संस्था, शासनपद्धती, शाहूमहाराज (राजर्षी), शांततामय सहजीवन, शीतयुद्ध, सत्ता, सत्ताविभाजन, समाज, समाजवाद, समान नागरी कायदा, सर्वोदय, सहकार, सहशिक्षण, संस्कृती, स्वयंसेवी संघटना इत्यादी.