9788193449417Deshmukh & Co Publishers PVT LTDDeshmukh And CompanyDeshmukh And Company Publishers Pvt. LtdNarahar Ambadas KurundkarNarahar KurundkarNarhar Ambadas KurundkarNarhar KurundkarSamajikShivaratraShivratraSocialदेशमुख अॅन्ड कंपनीदेशमुख अॅन्ड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि.नरहर कुरुंदकरराजकीय लेखलेखसंग्रहशिवरात्रसामाजिक
Hard Copy Price:
25% OFF R 260R 195
/ $
2.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
23% OFFR 260R
200
/ $
2.56
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
दिवंगत विचारवंत, लेखक नरहर कुरुंदकर यांच्या राजकीय लेखांचा हा संग्रह आहे. यातील नऊ लेखतीन गटांमध्ये विभागले गेले आहेत. यातील पहिले तीन लेख हिंदुत्ववादी, हिंदू राष्ट्रवादी राजकारणाची,हिंदू जातीयवादाची मीमांसा करणारे आहेत. नंतरच्या तीन लेखांत स्वातंत्र्यपूर्व काळात हिंदू मुस्लीम ऐक्यासाठी विफल प्रयत्न केलेल्या तीन व्यक्तींच्या विचारसरणींचा, राजकीय कर्तुत्वाचा लेखाजोखा मांडला आहे.
शेवटच्या तीन लेखांत मुसलमानांच्या धार्मिकतेचे आणि या धार्मिकतेमुळे त्यांच्याराष्ट्रनिष्ठेवर होणाऱ्या परिणामांचे विवेचन केले आहे. आधुनिक भारतासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांचा त्यांनी विविध अंगांनी वेध घेतला आहे. जातीयवादाला धर्माची चौकट घालू नये, असे ते सांगतात. प्रश्नांचे खरे रूप ते समोर आणतात..
आचार्य नरहर कुरुंदकर यांच्या लेखनविश्वातील मेरुमणी म्हणजे 'शिवरात्र'. या छोट्या पुस्तकात त्यांनी कट्टर हिंदुत्ववादी आणि कट्टर मुसलमानी लोकांना पूर्णपणे नामोहरम केलं आहे. पहिल्या भागामध्ये त्यांनी संघाचे सरसंचालक गोळवलकर यांची विचारसरणी मुद्देसूद पद्धतीने खोदून काढली आहे आणि गोपाळ गोडसे यांनी 'गांधीहत्या आणि मी' या पुस्तकामध्ये जाणूनबुजून जो खोटा इतिहास घुसडला अथवा मांडला आहे त्याचा पर्दाफाश केला आहे. ज्या लोकांना कट्टर हिंदुत्वाची विचारसरणी भावते व गांधीविरोधी विचार पटतात त्यांनी एकवार हे जरूर वाचावं आणि आपल्या सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा. दुसऱ्या भागात सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान, मौलाना आझाद, आणि अच्युतराव पटवर्धन या हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी झगडलेल्या लोकांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकला आहे. तर तिसऱ्या भागामध्ये त्यांनी भारतातील इस्लाम धर्मावर प्रकाश टाकला आहे व तमाम मुसलमान भारतीयांसाठी काही प्रश्न उपस्थित केले आहेत ज्यायोगे त्यांनी कट्टर इस्लामी धर्मवादाचा तात्विक विरोध केला आहे. प्रत्येक मराठी माणूस ज्याला या तिन्ही गोष्टींविषयी जाणून घेण्याची इच्छा आहे त्याने हे छोटंसं पुस्तक जरूर वाचलं पाह