Summary of the Book
शून्यातून निघालेला कोकणी माणूस जिद्दीच्या बळावर कुठली उत्तुंग झेप घेऊ शकतो, त्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे महाजिद्दी श्री. राजाराम शिंदे.
निराधार विद्यार्थी, गरजू गिरणी कामगार, नाट्यमंदारचे समर्थ निर्माते, अखील भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, कनवाळू समाज सेवक, अभ्यासू आमदार आणि आधारवड झालेल्या विकसनशील शिक्षण संस्थेचे ध्येयवादी संस्थापक-संचालक ही सात रंगांची रुपं श्री. राजाराम शिंदे नावाच्या इंद्रधनुष्यात साकारली आहेत. त्यांच्या पत्नीनं त्यांना नेटानं आजवर जी साथ दिली तिला तोड नाही.