Summary of the Book
अलीकडील काळात आयुर्वेदासंबंधात मोठी जागृती झाली आहे. विशेषतः काही आजारांवर आयुर्वेदिक औषधे घेण्याकडे कल दिसून येतो, मात्र, ही औषधे विकत घेण्यासाठी दुकानात जाण्यापेक्षा औषधी वनस्पतींची घरच्या बागेतच लागवड केली, तर त्या सहज उपलब्ध होतील आणि पैशाचीही बचत होईल, या दृष्टिकोनातूनच पूर्वा जोशी यांनी हे लेखन केले आहे.
या पुस्तकात त्यांनी संबंधित वनस्पतीचे आहारातील उपयुक्त अंग, गुणधर्म, अन्य माहिती, घरगुती वापरातील आरोग्यदायी, फायदे सांगून ती वनस्पती घरी कशी लावायची याचे मार्गदर्शन केले आहे. एकूण ५० औषधी वनस्पतींची अशा पद्धतीने पुस्तकातून माहीती मिळते. याचबरोबरच औषधी वनस्पतींच्या आरोग्यवर्धक आणि रुचकर पाककृतींचाही पुस्तकात समावेश आहे.