Summary of the Book
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा मंत्र ठरलेल्या वंदे मातरम् या गीतासंबंधात डॉ. माधव पोतदार यांनी या पुस्तकात विस्तृत माहिती दिली आहे. या गीताच्या प्रेरणा कोणत्या, निर्मिती कशी झाली या स्वतंत्र प्रकरणांमधून वेगळी माहिती मिळते. प्रारंभी 'धरतीमाता - भारतमाता' या प्रकरणातून त्यांनी भारतमातेची महती वर्णिली आहे.
'देश, राष्ट्र, राज्य, भूमिनिष्ठा' या प्रकरणात विश्वकल्याणाची भावना, भारतीय ज्ञानसंपदा, ब्रिटीश काळातील भारत आदी तपशील वाचायला मिळतो. 'राष्ट्रगीतातील भावदर्शन' हे प्रकरण वैशिष्ट्यपूर्ण आहे. या प्रकरणात विविध देशांची राष्ट्रगीते दिली असून, त्यावर थोडक्यात भाष्यही आहे. स्वातंत्र्ययुद्धादरम्यानचा काळ, भारताची फाळणी आणि त्यावेळची परिस्थिती; तसेच 'वंदे मातरम्'ची अमरता यासंबंधातील माहितीही समजते.