BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

आई समजून घेताना
Pages: 160
Weight: 215 Gm
Binding: Paperback
ISBN10: 8188284742
Share This Link:
https://www.bookganga.com/R/35MOC

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 200 R 180 / $ 2.57
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in India on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
eBook Price: R 200 R 130 / $ 1.86
Buy eBook
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
'आई समजून घेताना' हे उत्तम कांबळेंचे पुस्तक वाचताना आणखी एका आईची ओळख होते. वयाच्या पन्नासाव्या वर्षी आठवणी ताणत लिहिलेले हे पुस्तक. जसे आठवत गेले तसे लिहित गेल्यामुळे आठवणींना अनुक्रमणिका नाहीत. लेखकाच्या आयुष्यात प्रकाशवाटा घडविण्यासाठी आयुष्यभर राबलेली लेखकाची 'अक्का' स्वत:साठी वर्तमान घडवू शकली नाही ही लेखकाची तक्रार. स्वत: अतिशय कष्ट घेऊन मुलांच्या वारेमाप खर्चामुळे अस्वस्थ होणारी आई.

'तुझ्या लहानपणी आपन दोघं रोजगाराला गेलो आणि दिवसभर राबलो तर फक्त चार-पाच रुपये मिळायचे. इथं तुझं पोरगा तर दहा रुपयाच्या चॉकलेटचा एकच घास करतो. तुला मागचं दिवस कसं आठवत नाहीत' लेखकाला वारंवार भूतकाळात नेणारी लेखकाची आई. भाकरीच्या तुकड्यासाठी लहाणपणाची लाचारी आठवायला लावायची, तोंडातून लाळ गळेपर्यंत विनवण्या आठवायला लावायची. माणसाच्या दुखा:चे कारण इच्छाच असते हे तत्त्वज्ञान सांगणारी आईच असते.

लेखक आणि त्यांच्या आईचा संवाद सतत तुसड्यासारखा दिसतो. उदा. लेखकाने विचारले 'जेवलीस का?' ती म्हणायची, 'ढकलंलं दोन तुकडं पोटात'. 'कशी आहेस?' असे विचारल्यावर म्हणायची 'कसंचं काय, मरण जवळ आलंय'. 'डॉक्टरांकडे जाऊया का? 'डॉक्टर का कुणाचं मरण कायमचं रोखतो?' असे संवाद पुस्तकात जागोजागी दिसतात. अर्थात ती असे का बोलते त्याचा शोध लेखक घेतांना त्यांना जाणवते की, आईने अपार घेतलेले कष्ट.

तिच्यासमोर आजच्या सुखात भूतकाळातील भाकरी मिळवण्याची युद्धगाणी आठवायची आणि लेखक 'आई' ने घेतलेल्या कष्टाच्या आठवणीत रमून जातो. पैसे नसल्यामुळे डोक्याच्या केसांचा पुंजका विकुन मिळालेल्या पैशातून बुड्ढी के बाल (मिठाई ) मुलांना देणारी आई. फ्लॅट मधे राहत असल्यामुळे लेखकाच्या आईला बोलण्यासाठी जेव्हा कोणी मिळत नाही तेव्हा रस्त्यावर कोणत्याही बाईमाणसाशी गप्पा मारणारी लेखकाची आई. असे करतांना ऑकवर्ड वाटणारा लेखक. टी. बी. झाल्याचे कळलेले पाहून स्वत:हून नातवंडापासून दूर राहणारी लेखकाची आई. या आणि अशा कितीतरी प्रसंगातून 'आई समजून घेताना' लेखकाची दमछाक होते.
Book Review
Write a review

Honwane Sunita
01/08/2018

Atishay bhawsprshi aahe pustak , aajchya pidhila ashi pustak wachnyasathi prawrutt kel pahije......Khup abhinandan Kamble sir aapal , tumchya pustakachmule aamhala aaishi wagtanna zalelya chuka chi mafi magnyachi buddhi milali.....thanks sir🙏
Rashami Sarode
24/06/2016

chan pustak.
Sharad Dada ugale
12/10/2013

khup chan pustak ahe. same mazya jivnat ghadley. hey pustak wachtana mazi aai dolyasamor hoti sarkhi.
aai samjun ghetanna
12/05/2013

BUY
Bharat Banhatti
08/01/2013

great book to read
Sagar More
20/01/2012

as
abhay kadam
23/12/2011

khup sundar book aahe ...................khup mhanje khupach
Avinash Kamble
22/08/2011

पुस्तक वाचल्या पासून......आईवर ओरडून बोलनं....आपोआप बंद झालय.....खरच खुपच छान पुस्तक आहे ...कोणीही कोणालाही भेट देण्यासारखी खूप कमी पुस्तकं असतात ....त्यापैकी हे एक सुद्धा .....
वैष्णवी राजुलवार
25/05/2011

हे एक खूपचं छान पुस्तक आहे .
राजेश zinjurde
02/02/2011

खरच एक मनाला अनद आणि त्या बरोबर भावनात्मक करणारे असे हे पुस्तक सारणी आहे,खूपच छान आहे पुस्तक
बबन wathore
29/01/2011

कांबळे साहेब हे पुस्तक आजच्या सुशक्षित व चांगली नोवकरी करणाऱ्या दलित माणसासाठी एक मार्गदर्शक आहे .
प्रल्हाद शेळके
08/01/2011

पुस्तकाचा आशय खूपच छान आहे. एका आई ला आपल्या मुलांबद्दल जी काही ओढ असते ती लेखकाने इथे अगदी व्यवस्तीत आपल्या शब्दांत मांडले आहे.
Shaikh H स (पुणे)
06/01/2011

खूप सुंदर पुस्तक र्हुदायाल धक्का बसेल असे लेखन , अभिनंदन कांबळे सर
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address