Summary of the Book
मराठीत स्त्रियांची भरपूर आत्मचरित्रे आहेत. इतर भाषांपेक्षा मराठीत त्यांची संख्या जास्त आहे. या स्त्री आत्मकथनात वेग-वेगळ्या क्षेत्रातील स्त्रियांची आत्मचरित्रे आहेत. मुळात मलाही काही सांगायचय हि भावना स्त्रियांच्या मनात जागृत होणे हीच एक वेगळेपणाची जाणीव आहे. यामुळे स्त्रीभावना, स्त्रीविश्व, स्त्रियांचे विचार समाजासमोर आले. बहुतेक स्त्रियांनी स्वतःच आत्मचरित्रे लिहिले आहे. काही स्त्रियांनी आत्मकथन केले आहे. त्याचे शब्दांकन इतरांनी केले. डॉ. शांताबाई किर्लोस्कर म्हणजे सळसळता उत्साह होय. मुळात त्या अत्यंत देखण्या बुद्धीचे तेज चेहऱ्यावर. त्यात खेळाची संगीताची मनापासून आवड. त्यामुळे सर्वगुणसंपन्न किंवा अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय अधिक आहे. माणसांवर प्रेम करणाऱ्या पण अन्यायाविषयी, अमानवतेची चीड असणाऱ्या शांताताईंचे आत्मचरित्र म्हणजे सोलापूरच्या एकेकाळच्या समाजाचे दर्शन.