Summary of the Book
सहा महिने रात्र असलेला आणि हुडहुडी भरायला लावणारा प्रदेश कोणता, असं कोणी विचारलं, तर आपलं उत्तर तयार असतं... अंटार्टिका; पण या पलीकडे अंटार्टिकाची किती माहिती आपल्याकडे असते? फारशी नाहीच. मात्र, आणखी माहिती हवी असेल, तर हे पुस्तक मदतीला येतं. डॉ. माया भालेराव यांनी आपल्या या प्रवासाची माहिती शब्दबद्ध केली आहे. अंटार्टिका खंडाची ही रमणीय सफर आहे.
क्षितिजापर्यंत पसरलेला बर्फ, गार वारं, रस्त्यातून पाळणारे रेनिडीअर, पेंग्विन, जगातील शेवटचं टोक उशवाया, अॅल्बेट्रॉससारखे पक्षी, निको आयलंड, लेमेअर चॅनल, डिसेप्शन आयलं आदी भरपूर माहिती पुस्तकातून मिळते. या प्रदेशाचे हवामान, सफरीची तयारी कशी करायची या माहितीसह नकाशे, छायाचित्रांचा समावेश पुस्तकात केला आहे. अंटार्टिकाच्या सफरीला जाण्यापूर्वी आणि जाताना जवळ ठेवावे असे हे संदर्भपुस्तक