Summary of the Book
प.पू.श्री.श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे हे विसाव्या शतकातील एक महान लोकोत्तर सत्पुरुष होते. दत्तसंप्रदाय, नाथसंप्रदाय व भागवत संप्रदायांचे ते अध्वर्यू होते. त्यांचा लोकसंग्रह अफाट होता. म्हणूनच १५ जुलै १९८८ रोजी त्यांचा अमृतमहोत्सव करायचे ठरले, तेव्हा त्यांचे चाहते व शिष्यपरिवार यांच्या आनंदाला अक्षरश: उधाण आले.