Poonam Chavare, Akola
18 Jun 2013 11 05 PM
इंग्रजी ही पश्चिम-जर्मेनिक भाषा आहे. एंग्लो-सॅक्सन कुळातील जुन्या इंग्लिश पासून इंग्रजी भाषेची उत्पत्ती झाली आहे. इंग्रजीची मुळे जर्मेनिक भाषांत आहे व व्याकरण जुन्या इंग्लिशचे आहे. ब्रिटिश साम्राज्यातून पसरलेल्या इंग्रजी भाषेला आंतरराष्ट्रीय महत्त्व अमेरिकेची संयुक्त संस्थाने महासत्ता झाल्यामुळे आले. जागतीकरणामुळे इंग्रजीचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. संर्पक, रोजगार, शिक्षण इत्यादींकरता इंग्रजीचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. भारत हा इंग्रजी ही दुसरी भाषा असणारा महत्त्वाचा देश आहे व भारतीय इंग्रजी ही इंग्लिशची एक बोलीभाषा म्हणून ओळखली जाते.
Sabjay Kumbhar - Akola
18 Jun 2013 11 03 PM
इंग्लिश वा इंग्रजी भाषा ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. जगातील कानाकोपर्यात पसरलेली इंग्रजी भाषा अमेरिकेची संयुक्त संस्थाने,कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांची प्रमुख भाषा आहे तर कित्येक देशांची दुसरी भाषा व शासकीय भाषा आहे. जगभरात सर्वात जास्त शिकवल्या जाणार्या व समजल्या जाणार्या भाषेत इंग्रजीची गणना होते. इंग्रजी अर्वाचीन जगाची 'लिंग्वा-फ्रॅका' किंवा संर्पक-भाषा आहे. आंतरराष्ट्रीय भाषा असलेली इंग्रजी विज्ञान-तंत्रज्ञाम्प्;ाम्प्;ाान, व्यापार, इंटरनेटसह अनेक विषयात अत्यंत समृद्ध आहे. ३५ कोटी लोकांची इंग्रजी ही मातृभाषा आहे तर जवळजवळ १५ कोटी लोकांची दुसरी भाषा. जगभरात सुमारे १०० कोटी लोक या भाषेत साक्षर आहेत.
सुलभा ब्रह्मे
18 Jun 2013 10 42 PM
इंग्रजी ही जागतिक ज्ञानभाषा आहे, तिच्या कुबड्यांविना आपण पांगळे बनणार, असा दिशाभूलजनक पवित्रा घेऊन त्यांनी इंग्रजीची देव्हाऱ्यात प्रतिष्ठापना केली. महाराष्ट्रामध्ये मराठी राज्यकर्ते गेली सहा वर्षे मराठी माध्यमातील विनाअनुदानित नव्या शाळांना परवानगी नाकारून मराठीची गळपेची करत आहेत आणि इंग्रजी माध्यमातील शाळांना प्रोत्साहन देण्याचे धोरण रेटत आहेत. इंग्रजी ही पूर्णतया परकी, परिसरात नसलेली भाषा जर पहिल्या इयत्तेपासून शिक्षणाचे माध्यम म्हणून सार्वत्रिक वापरात आली, तर एवढ्या मोठ्या संख्येने इंग्रजी भाषा व सर्व विषय इंग्रजी भाषेतून शिकवणारे शिक्षक उपलब्ध होणे अशक्य आहे. इंग्रजी माध्यमाच्या मृगजळामागे बहुजन समाज धावू लागला, की त्यांना अर्धशिक्षित राखणे आणि स्पर्धेतून बाद करणे सोपे आहे. मराठी जनता आठ कोटी आहे. एवढी मोठी बाजारपेठ असताना, मराठीचा आग्रह धरला तर संगणक कंपन्यांपासून सारे जण मराठीकडे वळल्याशिवाय राहणार नाहीत.
पूर्वा - मासिक
18 Jun 2013 10 33 PM
आजची पिढी पुरेसा इंग्रजी भाषेचाही अभ्यास करीत नाही आणि मराठीचाही करीत नाही व मराठीबद्दल रास्त अभिमान बाळगत नाही. त्यामुळेच त्यांची अनेक क्षेत्रात पिछेहाट चालू आहे. मराठी भाषेविषयीचे निश्चित धोरण आजच्या तरुण पिढीने, विद्यार्थी वर्गाने ठरविले पाहिजे. विचारवंतांनी मार्गदर्शन केले पाहिजे व आजची फसवणूक थांबली पाहिजे.
माधव दातार
18 Jun 2013 10 27 PM
नोकरीच्या स्पधेर्त मराठी भाषिकांची स्पर्धात्मकता कमी होण्याचा संबंध शिक्षणाच्या माध्यमाशी (मराठी) आहे की या शाळांतील शिक्षणाचा दर्जा तुलनेत कमी असण्याशी आहे , हा खरा कळीचा मुद्दा आहे. माध्यमाचा मुद्दा जास्त दृश्य असल्याने तो जास्त चटकन नजरेत भरतो. इंग्रजीच्या वाढत्या वापराने मराठी भाषिक विद्यार्थ्यांची स्पर्धात्मकता वाढेल , या समजुतीने इंग्रजीची एक विषय म्हणून वा माध्यम म्हणून मागणी वाढते आहे व ती पुरविण्याचे प्रयत्न खाजगी आणि सरकारी पातळीवर होत आहेत. या प्रकारांत शिक्षणाच्या माध्यमाला महत्त्व मिळून दर्जाचा मुद्दा नजरेआड होत आहे ; पण कालांतराने केवळ इंग्रजी माध्यमामुळे स्पर्धात्मकता वाढत नाही , या स्वरूपांत तो पुढे येणे टाळता येणार नाही.
Universal Free School
18 Jun 2013 10 23 PM
भाषा ही संवादासाठी असते. संवाद हा मौखिक व लिखित या दोन्ही प्रकाराने अधिका-याला करावा लागतो. त्यासाठीच लिखित-भाषिक कौशल्ये तपासण्याची योजना केलेली आपल्याला आढळते. इंग्रजी भाषा अवघड वाटली (एक पारंपरिक गैरसमज) तरी परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला तिचे महत्त्व हे गुणांसाठी खूप आहे. गुणांसाठी तयारी करायला हवी. तयारीसाठी नियोजन हवे आणि ते करण्यासाठी ‘काय प्राप्त करायचे’ याची स्पष्टता हवी. म्हणजेच गुण किती मिळवायचे, यादृष्टीने एक संख्या निश्चित करू किती व कशा प्रकारे पेपर सोडवावा लागेल हा विचार महत्त्वाचा ठरतो. इंग्रजीची सखोल तयारी झाली तरीही परीक्षेत गुण कमी मिळणा-या उमेदवारांची संख्या आपल्याकडे भरपूर आहे. याची कारणे आपण सतत ऐकलीच आहेत. ‘सतत’ मुळे कदाचित ती दुर्लक्षित राहत असावीत. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच चुकांकडे आपण वळतो. महत्त्वाचे कारण आहे ‘भीती’. इंग्रजीची योग्य तयारी करणे व त्यातून आत्मविश्वास येणे गरजेचे असते. त्यासाठी तयारी करताना कुठलेही कच्चे दुवे राहून द्यायचे नाहीत. म्हणजे आपल्या तयारीबाबत आपोआप विश्वास वाटेल.
Universal Convent School
18 Jun 2013 10 16 PM
आपल्याला भाषेचा दर्जा ‘टाइम्स’ किंवा ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’च्या दर्जाचा ठेवायचा नाही, तर सोपी व लहान वाक्ये अशा स्वरूपाचा ठेवायचा आहे. आपले म्हणणे उत्तरे तपासण्यापर्यंत पोहोचले की झाले. त्यामुळे एवढा सोपा असणारा विषय बºयाचदा केवळ भीतीपोटी अवघड होऊन बसतो व त्यामुळे सतत गुण कमी मिळत राहतात. असे काहीही आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून आपल्याला स्वत:साठी एक उच्च ध्येय ठेवावे लागेल. ते म्हणजे ‘मी इंग्रजीत कमी पडणार नाही.’ इंग्रजी भाषा आज सर्वच क्षेत्रांमध्ये आवश्यक असल्यामुळे याची भीती, समज-गैरसमज टाळून आपल्याला परिपूर्ण तयारी करावी लागेल. त्यासाठीच इंग्रजी भाषा-अभ्यासक्रम, गुण विभागणी व तयारीसाठीची मेहनत या दृष्टिकोनातून केलेला हा लेखनघाट आहे.
Sudama
18 Jun 2013 10 14 PM
सर्वात मोठा अडथळा आहे इंग्रजीच्या भीतीचा. हा विषय आपल्याला फार घाबरवतो का? तसं घाबरण्यासारखं काही नसतं. भीती असते ती यातील अगणित शब्दसंग्रह व एकाच अर्थाचे अनेक शब्द याची. हे सारं लक्षात राहील? इथपासून वाटणारी भीती प्रत्यक्ष परीक्षेपर्यंतही सोबतच राहते. कधी कधी तर परीक्षेपुरते चांगले पाठांतर करून आलेले ‘शूर’ मावळे जर परीक्षेतील प्रश्नांची काठिण्यपातळी वाढलेली दिसली की ‘गर्भगळीत’ होतात. खरं पाहिलं तर जे इतर भाषांचं तेच इंग्रजीचं. त्यात एवढं भिण्यासारखं मात्र काहीच नाही.
Sunildada
18 Jun 2013 10 12 PM
कायदा तयार करणे असो की त्याची योग्य ती अंमलबजावणी असो, अधिकारी हा कुठे ना कुठे इंग्रजीच्या संपर्कात येतो. इंग्रजी भाषा अनिवार्य आहे आणि त्यावरच यश अवलंबून आहे. •इंग्रजीचा फायदा म्हणजे व्याकरण सोपे आहे व वेगाने लिखाण करता येऊ शकते. हे सर्व इंग्रजीचे फायदेशीर गुण आपल्या क्षमतेने विकसित करण्याचा प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळेल.
Sunil
18 Jun 2013 10 10 PM
•प्रशासनाची इंग्रजी भाषा ही काहीशी क्लिष्ट वाटणारी आहे. जर तज्ज्ञांना ती वारा घालायला लावते तर सामान्यांना काय वाटत असेल? परंतु जेव्हा जमीन महसुलीचे नियम, सतत अद्ययावत करण्यात येणारे कायदे अधिका-यांना अभ्यासावे लागतात, जेव्हा कायद्याचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत तो सहभागी असतो (सचिव वा तत्सम) त्या वेळीही त्याला इंग्रजीवरील प्रभुत्वाची मदत होत असतेच.
SABDA in India
18 Jun 2013 10 08 PM
‘जग हे एक खेडे आहे’ या मुळाशी असणारी ज्ञानवहनाची संकल्पना व त्याला इंग्रजी भाषेमुळे आलेली गती तर सर्वश्रुत आहे. यामुळेच आता इंग्रजीचे प्रशासनातील महत्त्व पूर्वापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे.
Panchgani University
18 Jun 2013 09 45 PM
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिणार तो गुरगुरणारच! यात शिक्षण हा शब्द काढून ‘इंग्रजी’ शब्द घातला तर तयार होणारा अर्थही तेवढाच महत्त्वाचा आहे. ‘इंग्रजीत बोलणा-याला सर्वच जण मान देतात व म्हणून तो गुरकावतो,’ असा तो अर्थ नाही, तर ज्याला इंग्रजी चांगले येते तो आज चांगल्या प्रकारे आयुष्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकतो, असा याचा अर्थ आहे.
Library
18 Jun 2013 09 44 PM
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा जसा ‘इंग्रजी शिक्षणाशी’ अविभाज्य संबंध आहे तसाच इंग्रजी भाषेचा आजही भारताच्या प्रगतीशी संबंध आहे. मात्र, नेहमीच चवीने चघळलेल्या विषयांपैकीच ‘इंग्रजीत मराठी टक्का कमी का?’ हाही विषय आहे. थोडक्यात, मराठी माणूस इंग्रजीला लवकर जवळ का करत नाही? हे न सुटलेल्या अनेक कोड्यांपैकी एक आहे.
अलका रेवतकर, मुख्याध्यापिका - रणधीर भदोरिया महाविद्यालय, उमरेड
18 Jun 2013 09 38 PM
स्पर्धेचे युग आहे तेव्हा जागतिक पातळीवर यशस्वी होण्यासाठी इंग्रजी भाषेचे महत्त्व समजून घ्यावे व त्या दिशेने वाटचाल करून प्रगती साधावी.
Kavita Sagar Publication
18 Jun 2013 09 31 PM
माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षाच नाकारल्याने स्पर्धा संपुष्टात आली असली तरी विद्यार्थ्यांनी ऐनवेळी अभ्यास करण्यापेक्षा नियमित अभ्यासावर भर द्यावा. विपरित परिस्थितीवर मात करून अनुकूल परिस्थिती निर्माण करणारा खरा हुशार असतो.
Jain Philately
18 Jun 2013 09 29 PM
मराठीचा वृथा अभिमान न बाळगता इंग्रजी काळाची गरज असून तिचा अभ्यास आवश्यक आलेला आहे.
Hobby Academy
18 Jun 2013 09 26 PM
काळानुरूप बदल स्वीकारणारेच स्पर्धेत टिकू शकतात. भाषेचा फाजील अभिमान न बाळगता शैक्षणिक दृष्टय़ा इंग्रजीचे जागतिक महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. मराठीचा अभिमान असावा. चांगले मराठी येण्यासाठी अवांतर वाचनही असावे. मात्र, जगाची ज्ञानभाषा इंग्रजी असल्याने इंग्रजीचे महत्त्व नाकारून चालणार नाही. त्यासाठी इंग्रजी व मराठीचे रोज एक उत्तम वर्तमानपत्र वाचणे आवश्यक आहे. सद्यस्थितीला प्रत्येक क्षेत्रात संकुचित वृत्तीचे नेतृत्व बहुसंख्येने दिसून येते. युवावर्गाने प्रादेशिक, भाषक आणि धार्मिकवादात गुंतून न राहता शिक्षणाच्या माध्यमातून उत्कर्ष साधणे आवश्यक आहे.
Film Society
18 Jun 2013 09 23 PM
एखादी भाषा शिकायची झाल्यास त्या भाषेतील आपला शब्द साठा वाढविल्यास शिवाय ती भाषा आपण शिकूच शकत नाही. हे सत्य लक्षात ठेवून या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. इंग्रजी शब्द संग्रह वाढवण्याची सुरुवात विरुद्धार्थी शब्दांपासून केली तर फारच उत्तम, कारण विरुद्धार्थी शब्दांचे वाचन किंवा पाठांतर करतांना कंटाळा येत नाही . पाठांतरानंतर वाचन, परत लेखन, असा आलटून-पालटून अभ्यास केल्यास. आपला शब्दसंग्रह नक्कीच वाढेल.
Creative English Academy
18 Jun 2013 09 21 PM
इंग्रजी भाषेचे महत्व आणि वापर दिवसेंदिवस वाढवतच जात आहे. संपर्क - माध्यम म्हणून इंग्रजीला आज जे स्थान आहे ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या बर्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकणे अवघड जाते . खरतरं कोणतीही भाषा सोपी किंवा अवघड अशी नसते. तर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जसा असतो त्यावर ते अवलंबून असते.
Alisha Advertising
18 Jun 2013 09 19 PM
भाषेमुळे आपल्या मनातले विचार, भाव-भावना प्रकट करता येतात. भाषेशिवाय जीवनाची आपण कल्पनाच करू शकत नाही. भाषा ही आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपण आपल्या मातृभाषेत खूप चांगलं बोलतो, आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान असतो. परंतू मातृभाषा सोडून आणखीन एक दोन भाषा जर येत असतील तर त्याचा देखील आपल्याला फायदा होतो हे जाणून घ्यायला हवे. असे म्हणतात 'Knowledge is not burden' ज्ञान हे ओझ नाही.