Summary of the Book
प्रबोधन करणे हा सिनकरांच्या कवितांचा गाभा आहे. बालमनाचे प्रबोधन करताना ते कवितेतून आईची माया, वडिलांचे प्रेम, पर्यावरणाचे महत्त्व, शिक्षणाची गरज आणि कालबाह्य होत चाललेल्या पत्रलेखनाचे महत्त्वही अधोरेखित करतात.
मंगेश पाडगावकर म्हणतात तसं, जी कविता मुलांना आवडते, त्यांना ती पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटते, ती मुलांसाठी लिहिलेली कविता असते. अगदी तसाच प्रयत्न डॉ. विनोद सिनकर यांनी आपल्या कवितांमधून केलेला आहे.
या कवितांमधून बालमित्रांना आई-बाबा, आजी-आजोबा, ताई-दादा, वर्ग-मित्र, शाळा-शिक्षक, झाडे, वेली, फळे, पाने, फुले, डोंगर, नद्या असं सगळं अनुभवायला मिळतं.
मुलांशी रोज वेगवेगळ्या निमित्ताने होणाऱ्या संवादातून लेखकाने या कविता लिहिल्या असल्याने त्या बाल आणि कुमार या दोन्ही वयोगटातल्या मुलांसाठी उपयुक्त आहेत.
बालकांच्या बदलत्या भावविश्वाशी नाते जोडतानाच त्यांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासात या कविता नक्कीच भर घालणाऱ्या आहेत.
या संग्रहात कवितांसह बोलक्या चित्रांचाही समावेश आहे.