Summary of the Book
या पुस्तकात आपल्याला भेटणार आहेत पीटर, जेनेट, जॅक, पॅम, बार्बरा, कोलिन आणि जॉर्ज. हे सर्वजण आहेत सात गुप्तहेर आणि स्कँपर - एकदम खास स्पॅनिअल कुत्रा! कोणत्याही रहस्याचा छडा लावण्यासाठी एका पायावर तय्यार! जॅकची धाकटी बहीण सुसी, खूपच कटकट करते! ती स्वत:ची "गुप्तहेर संघटना' काढणार म्हटल्यावर सात गुप्तहेर चिडतात! त्याच सुमारास काही पौसे चोरीला जातात. प्रमुख संशयित असते- सुसी. `सीक्रेट सेव्हन'चा यावर विश्वास बसलेला नाही. सुुसी इतकं नीच काम करणार नाही. पण मग...