Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/
$
4.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
गॉडफादर' या विश्वविख्यात कादंबरीचे लेखक मारिओ पुझो यांची नवी कादंबरी. जन्मभर खास सिसिलियन पद्धतीनं भरपूर गुन्हे केल्यावर वृद्धपणी संघटित गुन्हेगारीतून आपल्या मान, प्रतिष्ठेला कुठेही तडा जाऊ न देता निवृत्त होण्याइतका डॉन एप्रिल निश्चितपणे दूरदर्शी आणि समयसूचक होता.
मुलांना त्यानं गुन्हेगारी जगाचा वाराही लागू दिलेला नव्हता. त्याचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांनं सिसिलीमधून एक पुतण्या दत्तक घेतला. त्याचं नाव 'ऍस्टर व्हायोला'. डॉन रेमंड एप्रिलची गुन्हेगारीतून निवृत्ती म्हणजे इतर माफिया फॅमिलींना आपले हातपाय पसरण्याची संधी होती, पण एफबीआयचा स्पेशल एजंट कुर्ट सिल्की मात्र तिकडे संशयाने पाहत होता. तेवढ्यात एक अतर्क्य घटना घडली...निवृत्त झालेल्या डॉन एप्रिलचा खून झाला ! सिल्की आणि एफबीआयनं माफियाविरुद्ध आणखी एक जोरदार मोहीम उघडली आणि ऍस्टर व्हायोला आणि डॉन एप्रिलची मुलं आणखी एका - शेवटच्या - युद्धात विनाकरण ओढली गेली. पण आता त्यांच्या मनात संभ्रम आहे - कायद्याच्या बाजूला नेमकं कोण आहे ? आणि आपण काय करायचं ?