Summary of the Book
डोळ उद्योगसमुहाचे संस्थापक सुरेश डोळ यांचे श्वेता गानू यांनी लिहिलेले हे जीवनचरित्र आहे. कोणत्याही उद्योजकाचे चरित्र नेहमीच प्रेरणादायी असते. डोळ यांचे हे चरित्र प्रेरणादायी आहेच शिवाय ते सद्गुणांचा पुरस्कार करणारे आहे. डोळ यांचे बालपण कष्टप्रद होते.
ते तीन वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे आणि ते २५ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यामुळे एकीकडे पोरकेपण आणि दुसरीकडे संकटांशी सामना असे त्यांचे प्रारंभीचे आयुष्य होते. 'जनरल इलेक्ट्रिक' कंपनीची निर्मिती हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला. आपल्या उद्योग समुहातील कर्मचाऱ्यांना त्यांनी कुटुंबाचाच एक भाग मानले. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली.