Hard Copy Price:
10% OFF R 500R 450
/ $
5.77
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
एम टी-मोटर टॅंकर म्हणजे यंत्रचलित द्रववाहक. `मारू’ म्हणजे जहाज. `आयवा मारू’ या जपानी शब्दांचा अर्थ – प्रेम आणि एकरूपता यांच्या भावुक चेतनेचे जहाज. `एम टी आयवा मारू’चे कथानक हॉंगकॉंगच्या किनार्यावर सुरू होते. चीनच्या किनार्यावर वेग घेते. फिलिपीन्सच्या किनार्यावर रंगू लागते...
`एम टी आयवा मारू’ हा प्रेम-द्वेष, मत्सर-घृणा या भावभावनांचा जिवंत झंझावत आहे. पंचमहाभूतांचे जीवघेणे वादळ आहे. ही कादंबरी वाचताना एकच विचार सतत मनात येत राहीलः ही काल्पनिक कादंबरी आहे? की सत्य घटनांचे विवेचंन आहे? ही कादंबरी वाचताना जर सागराने आभाळात भिरकावलेली `आयवा मारू’ तुम्हांला स्वतःला दिसली असेल, जर लाटांचे तांडव तुम्ही स्वतः अनुभवले असेल, जर वार्याचे घोंघावमे तुम्हांला स्वतःला ऐकू आले असेल, जर `आयवा मारू’ ने तुम्हांलाही झपाटले असेल, तर ही `आयवा मारू’ केवळ कल्पित असणे शक्य आहे का?
अथांग सागर आणि हा सागर पार करायला लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती. निसर्गाशी, स्वतःच्या भावनांशी, मर्यादांशी अपुऱ्या साधनांच्या सहाय्याने टक्कर देत पुर्ण केलेली एक भयाण सफ़र.
बापाच्या विकृतीवर विकृत सुड घेणारी उज्वला, खेडवळ पत्नीला पाश्च्यात्य संस्कृतीत वावरायला तयार करायला धडपडणारा, प्रसंगी त्यासाठी तिच्या भावनांचा विचार न करता लैंगिक विकृतीकडे झुकणारा दीपक, ह्या सगळ्या छळवादातुन जवळपास वेडी झालेली उज्वला, वेश्यालय चालवणारी ॲना प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे वेगळं अस्तित्व आहे तरी एक क्षण असा येतो की प्रत्येकाचा शेवटही एकच दिसु लागतो. त्यावेळी प्रत्येकाचं वागणं प्रत्येकाच्या मर्यादा अधोरेखित करतात.
जहाजावरचं आयुष्य, तिथली दडपणं तिथले धोके आणि ह्या सगळ्याला कसलीही भिक न घालणारा व्यवहार खुप संयमित भाषेत चित्रीत केलाय सामंतांनी.
Vikram Patil
30/06/2014
Ekdum Zakkas book ahe, jenvha tumhi he book vachayala ghechal sampe pariyant sodanar nahit......
shelar pradip dinkar
12 Aug 2011 05 30 AM
three chears for anant saamant........hip hip huraye.......hip hip huraye.....hip hip huraye........