Summary of the Book
रुडयार्ड किप्लिंग यांचे नांव निघाले की 'जंगल बुक' आठवते. त्या वेळेला संपूर्ण जगावर ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटीश असेलेल्या किप्लिंग यांचे जन्मापासून बरेचसे वास्तव्य भारतात होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात सातत्याने भारतीय प्रसंग आढळतात. त्यांची किम ही कादंबरी सर्व रचनांमध्ये सर्वोत्कृष्ट मानली जाते.
या कथेतील नायक किम हा निराधार असून, लाहोरमधील एका महिलेने त्याचा सांभाळ केला. तो धाडसी, चतुर व भलताच हुशार होतो. जीवनाच्या विविध टप्प्यांवर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळणारे प्रसंग घडतात. त्यातून तो घडत जातो. त्याचे हे घडणे उत्सुकतावर्धक आहे. ते वाचकाला खिळवून ठेवते. तसेच पाकिस्तानसह भारताचे दर्शन यातून घडते.