Summary of the Book
अलीकडे कवींमध्ये जागतिकीकरणाचे भान असणारा हा एक महत्वाचा कवी ! बुद्ध, ताओ, कार्ल मार्क्सपासून ते किनाऱ्यावरच्या कालपुरुषापर्यंत त्यांच्या प्रतिभेचा विस्तार आहे. त्यांच्या काव्यात तत्वज्ञान, कल्पकता आणि वास्तवाचा सुंदर मेळ जमून जातो. हवेत तरंगणाऱ्या पक्ष्यापासून ते आसमानात उड्डाण करणाऱ्या विमानापर्यंत त्यांची प्रतिभा वेगवान संचार करते ! उंदरापासून माउसपर्यंतचा तंत्रज्ञानात्मकप्रवास त्यांची कविता आपले 'काव्यात्व' न सोडता अधोरेखित करते !
त्यांच्या काव्यप्रतिभेचा आवाका इतका प्रंचड आणि स्वयंभू आहे की, जे विषय गद्य- रुक्ष आहेत, तेही मृद्मुलायम बनून त्यांच्या कवितेतून प्रकट होतात. भुकेमुळे क्षुब्ध झालेल्या आणि त्यासाठी स्वत:चाच आत्मा कुरतडून खाणाऱ्याच्या 'आत्मह्त्ये' पासून ते अशांना चेहरा देणाऱ्या नारायण गंगाराम सुर्वेपर्यंत त्यांची कविता आत्मीयतेने धावते ! अस्वस्थतेने व्यक्त होते.