Summary of the Book
ओघवती भाषा, आसपासकडे पाहण्याची निराळी दृष्टी, सखोल निरीक्षण आणि गुंतवून ठेवण्याची हातोटी असणाऱ्या लेखक सतीश तांबे यांच्या वाचनीय कथांचा हा संग्रह आहे. ज्येष्ठ समीक्षक म. द. हात हातकाणंगलेकर यांनी या कथांना नव(नव)कथांच्या पलीकडे जाणाऱ्या कथा असे म्हटले आहे.
मराठी साहित्यात आता आशयाची वानवा नाही, मात्र घाट व शैली हे अन्य दोन महत्वाचे घटक इतिहासजमा झाल्यासारखे आहेत. त्यामुळे विलक्षण प्रवाहीपण हे कथांचे वैशिष्ट्य ठरले आहे. ते धक्कातंत्राचा मोठा खुबीने वापर करतात. त्यांना काही वेगळे सांगायचे आहे आणि त्यांनी काही वेगळ बघितले आहे, असे कथा वाचताना वाटत राहते.