BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

चांदणबाग
Pages: 32
Weight: 30 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789386557216

Available Immediately

 
Hard Copy Price: R 70 / $ 1.00
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
कवयित्री लता गुठे यांचा 'चांदणबाग' हा बालकाव्यसंग्रह प्रकाशित होत असताना मनात आनंदाच्या लाटा उसळत आहेत. मुले आभासी जगात रमतात , वाचनात रस घेत नाहीत , असा मुलांवर आरोप होतो . पण मुलांसाठी विशेष साहित्य उपलब्ध नाही . ही तक्रार दूर करण्याचा मार्ग मोठ्यानीच शोधायला हवा , याची जाणीव असलेल्या लता गुंठे यांनी प्राप्त परिस्थितीवर उतारा शोधण्याचा सतत प्रयत्न करत आहेत . त्यांची 'बिनभिंतीची शाळा' हा बालकथासंग्रह वाचल्यापासून मला त्यांच्या शैलीची भुरळ पडली आणि शोधक नजरेने त्यांची निर्मिती जाणण्याचा मला छंद जडला . त्यांच्या कवितेतील संवेदनशील आणि तरलतेच्या मी प्रेमात पडले , असे म्हणणे अतिशोयोक्ती ठरणार नाही . अशा संवेदनशील कवयित्रीने मुलांसाठी कविता लिहिणे , हे मुलांचे भाग्याच !
             'चांदणबाग' या कवितेत चंद्रात ससा वा हरीण दिसणे , सोनपरीबरोबर आकाशात भटकंती करून चक्कर येणे नि पावसाच्या सरीसंगे वास्तवात कोसळणे केवळ अप्रतिम ! परीच्या रूपाच्या रोमांचक कल्पनेत रमलेल्या बाल जीवांना लागलेली आईच्या कुशीची ओढ लताला कळते . लाजाळूच्या फुलाशी केलेला तरल संवाद मनाला भुरळ घालतो . आईच्या वाढदिवसाची संवेदनशील कल्पना , चिकुबाई - मिकुबाईशी केलेला संवाद वाचताना मजा येते . उन्हात पडलेल्या पावसात निर्माण झालेल्या इंद्रधनुष्याचे कौतुक नि पावसातल्या सहलीची रोमांचक कल्पना मुलांचं भावविश्व साकारते . 'समजून घ्या रे'मधील रसाळ भाषेत केलेला उपदेश असो , गणपतीबाप्पाची कविता असो की हल्लीच्या शिक्षण प्रणालीत दप्तराच ओझ उचलायला लावून मुलांचं गाढव झाल्याची कटू जाणीव 'पक्षांचा गाव' या शेवटच्या कवितेपर्यंत कवयित्री मुलांच्या भावविश्वाशी समरस झाल्याची सातत्याने प्रचिती मिळते .
          वयाचे ज्येष्ठत्व जमेस धरून तिचे भविष्यातील सर्व प्रयंत्न यशस्वी होवोत आणि तिची भरारी आकांक्षापुढती गगन ठेंगणे सिद्ध करो , असा आशीर्वाद देते.
Book Review
Write a review

Prashant Raut
04/06/2019

बालसाहित्य लिहीण्याकडे लता गुठे ह्या लेखिका आणि कवयिञीचा नेहमीच कल राहीला आहे. इटुकले पिटूकले आणि बिनभिंतीची शाळा ह्या यशस्वी बालसाहित्यानंतर चांदणबाग हा अजून एक आकर्षक व वाचनीय कवितासंग्रह त्यांनी लहान मुलांच्या हातात दिला आहे, तो मुलांना नक्की आवडेल असाच आहे. खूप खूप शुभेच्छा ‍‍‍👌👍 प्रशांत राऊत, विलेपार्ले, मुंबई
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.