Hard Copy Price:
25% OFF R 420R 315
/ $
4.04
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
'देवानं तुम्हाला निर्माण केलंय, असंच कायम तुम्हाला सांगितलं गेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो 'तुम्ही देव निर्माण करताय !' माझ्या मनात जेव्हा हे शब्द उमटले आणि या संहितेत ते उतरवले, तेव्हाच ते आध्यात्मिक क्षेत्रात खळबळ उडवून देणार, क्रांती करणार हे मला ठाऊक होतं. मी आधीही असं म्हटलंय, हे माझ्या लक्षात आलं; पण 'संवाद परमेश्वराशी' कशा प्रकारचा अनुभव घ्यायला तुम्हाला आमंत्रित करतंय हे कळावं म्हणून मी हे पुन्हा 'हमीपूर्वक' सांगतोय. आयुष्याचा एक नवा अर्थ तुमच्यासमोर उलगडतो आहे आणि तुमच्या 'स्व-रूपा' बद्दल जागृतीची एक नवी पातळी तुम्ही गाठू पाहत आहात. एका वेगळ्या जगाच्या निर्मितीत आपला खारीचा वाटा उचलून संप्रेषणाचा उंचावलेला स्तर गाठण्याचं ध्येय तुम्हाला गाठायचं आहे. त्यासाठी कटिबद्ध व्हायला तुम्हाला यातून प्रेरणा मिळेल आणि उन्नयनाच्या दिव्य प्रक्रियेत आणखी वैयक्तिकरीत्या सहभागी होता येईल. त्यातून अखिल विश्वात मानवतेचं वारं अधिकच वेगानं वाहू लागेल. मानवतेचा प्रसार आणखी झपाटयानं होऊ लागेल.