Summary of the Book
मुंबई चे आकर्षण कोणाला नाही? इंग्रजांच्या काळात मुंबई या बेटांचा विकास झाला. आता या महासागराकडे जगाचे लक्ष असते. काय नाही मुंबईत अगदी समुद्रापासून लेणी, मंदिरे, चर्च, दर्गा, ऐतिहासिक वस्तू, इमारती, उद्याने, रस्ते, पुल, बांधारे,बाजारपेठ, शैक्षणिक, व्यावसायिक संस्था, चित्रनगरी असे सर्वकाही आहे; पण यातही खऱ्या अर्थाने मुंबई चे अस्तित्व टिकून आहे.
या मुंबईची ओळखभारतकुमार राऊत यांनी 'अशी हि मुंबई' मधून करून दिली आहे. पूर्वी मुंबईकर चाकरमान्यांना कोकणातील त्यांच्या मुळ गावाशी बांधून ठेवणारा भाऊचा धक्का, ख्रिस्ती संस्कृतीची साक्ष देणारे अफगाण चर्च, पर्यटकांचे आकर्षण असणारे हँगिग गार्डन, बोरिवली रस्त्यावरील मंडपेश्वर लेणी, रुबाबदार राजभवन,घोडबंदर याची पूरक माहिती हे पुस्तक देते.
जुने बुक स्टॉल, रस्त्यारस्त्यावर चालणाऱ्या खाणाळी,सरकारी कार्यालये, चित्रपटगृह, मुंबईतील गणेशोत्सव, स्मारके, याची खरी ओळख यात करून दिली आहे. प्रत्येक ठिकाणाबद्दल वेगळी माहिती यातून मिळते व वाचता वाचतातच मुंबई दर्शन होते.