Summary of the Book
ज्यांचा टर्निंगशी संबंध येतो अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी लेथ या यंत्राविषयी व त्यावरील कामाविषयी विपुल माहिती या पुस्तकात आढळते. या पुस्तकात टर्निंग या विषयाच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी देण्यात येणार्या साध्या इंजिन लेथविषयी माहिती दिलेली आहे. थिअरीच्या भागाबरोबरच प्रायोगिक माहितीच्या दृष्टीने काही जॉबही येथे विचारात घेतले आहेत. त्यांची कृती व इतर व्यावहारिक माहितीही साकल्याने दिलेली आहे. आणि ती देत असतानाच वाचकांना बाहेर मशीनशॉपमध्ये काम करायचे आहे, याची सतत जाणीव ठेवली आहे.
या पुस्तकात शेवटी लेथच्या इतर प्रकारांविषयीही माहिती दिलेली आहे. यामध्ये दिलेल्या निरनिराळ्या कोष्टकांचा तसेच आकडेमोडीचा वाचकांना खूपच फायदा होईल असे वाटते. शिवाय आकृत्यांसह स्पष्टीकरण असल्याने ते अधिक सुलभ झाले आहे.
आय.टी.आय., तांत्रिक शालांत परीक्षा, आणि इतरत्र जे लेथवरील टर्निंगचे क्लासेस चालतात व ऑप्रेंटिस म्हणून ज्यांना लेथशी संबंध येतो अशा विद्यार्थ्यांना हे पुस्तक मोलाचे मार्गदर्शन करेल.