BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

श्रीदत्तात्रेयापराधक्षमापन स्तोत्र
Pages: 95
Weight: 150 Gm
Binding: Paperback
ISBN13: 9789383804863

Available Immediately

 
Hard Copy Price: R 100 / $ 1.43
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांची गुरुचरित्रावर नितांत श्रद्धा, भक्ती होती. त्याचा गाढा अभ्यास केलेला असल्याने प्राकृत भाषा व त्याचे निर्बंध यामुळे गुरुचरित्रमाला आलेल्या मर्यादा त्यांच्या लक्षात आल्या. त्यांनी गुरुचरित्र कोणत्याही निर्बंधाशिवाय संस्कृतमध्ये लिहिले.

द्विसहस्त्री गुरुचरित्र संस्कृतमध्ये असल्याने कालांतराने ते लोकांना समजेनासे झाले. मग त्यांनी द्वीसहस्त्री टीका लिहून सामान्यांना समजेल, अशा रुपात तो आणला. त्यातील एक भाग असलेल्या स्तोत्राचे विवेचन वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी केले आहे. हे स्तोत्र म्हणजे 'श्रीदत्तात्रेयपराधक्षमापन स्तोत्र' होय. भुजंगप्रयात रचलेल्या या स्तोत्राचा मुख्य स्थायिभाव म्हणजे शरणागती, असे लेखक सांगतो. क्षमा करणे म्हणजे काय, ती कोणी कोणाला करावी, क्षमेची पूर्वअट हे स्पष्ट केले आहे.

हे स्तोत्र गुरुचरित्रावर आधारलेले असल्याने दत्तात्रेय म्हणजे कोण हे सांगून स्तोत्राचे श्लोक १ ते ७ चे रसग्रहण, श्लोक ८ ते १० चे उसंहारात्मक विवेचन करताना श्लोकांचा अर्थ उलगडून सांगितला आहे.
Book Review
Write a review

Akshay
15/12/2016

अतिशय सुंदर पुस्तक आहे. ईश्वराची, सद्गुरूंची सेवा करताना, साधना करताना जे अनेक अपराध होतात, त्यांची क्षमा मागितल्याशिवाय आपल्या सेवेची, सत्कार्याची फलश्रुती पूर्णपणे साध्य होऊ शकत नाही. प.प. स्वामी महाराजांनी ह्या स्तोत्रात सांगितलेला सर्वात मोठा अपराध म्हणजे त्या सर्वश्रेष्ठ तत्त्वाच्या नामाचं विस्मरण. जीवनात घडी घडी ज्यांच्या आधाराने आपण वाटचाल करतो, त्यांच्या नामाचं विस्मरण आपल्याला कधीही होता कामा नये. पण ते होतं. ह्या फार मोठ्या अपराधाची क्षमा कशी मागावी, हे येथे स्वामी महाराज सर्व भक्तांना शिकवीत आहेत. क्षमा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता काय ह्याचं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि सखोल विवरण ह्या पुस्तकात केले आहे. जे जे भक्त स्वतःला भक्त म्हणवतात त्या त्या सर्वांनी ह्या पुस्तकाचा अभ्यास केलाच पाहिजे !! श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ....!!!
reader
10/12/2016

Excellent book..!!!!!!!! must read...
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.