Summary of the Book
'लघुउद्योग' या विषयावर सध्या पुष्कळ पुस्तके मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये आढळतील. एखादे दुसरे मराठी पुस्तक सोडले, तर बाकीची सर्व पुस्तके तोंड भरून आशीर्वाद देतात- 'यशस्वी व्हा' - शासनाच्या खूप योजना आहेत. त्यांची मदत घ्या. पण नाण्याला दुसरीही बाजू आहे. तो छाप पाहिलात, या कट्याचीही माहिती करून घ्या. खोट्या भ्रमामुळे भारून जाऊन या व्यवसायाच्या क्षेत्रात उडी घेऊ नका. यासाठीच मला हे 'लघुउद्योगाची लक्ष्मणरेखा' हे पुस्तक लिहावेसे वाटले. मराठीत लिहिलेली ती अन्य पुस्तके वाईट नाहीत. पण त्यातील कुठल्याही पुस्तकाच्या बरोबरीने तुम्हाला हे पुस्तक बरोबर बाळगावे लागेल.