Hard Copy Price:
R 255
/ $
3.27
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
स्वतःचा व्यवसाय आणि दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे यात मोठा फरक असतो. सरकारही 'स्टार्ट अप'सारख्या योजना आखत आहे. मात्र १९९०च्या दशकात आर्थिक उदारीकरणात रोजगाराकडून स्वयंरोजगाराकडे वळलेल्या तेही जातीव्यवस्थेचे चटके सहन करूनही भरारी घेतलेल्या १५ दलित उद्योजकांची प्रेरणादायी कथा 'आमचंदेखील एक स्वप्न आहे... 'मधून मिलिंद खांडेकर यांनी सांगितल्या आहेत.
घरात खायला नसतानाही वडिलांनी दिलेल्या शिक्षणाचा वसा स्वीकारून अधिक अर्थार्जनासाठी दास ऑफशोअर इंजिनिअरिंग' कंपनी सुरु करणारे अशोक खाडे, मुंबईत दोन रुपये रोजंदारी मिळविणाऱ्या व नंतर बलार्ड इस्टेटमध्ये एक हजार कोटींची कमानी ट्यूबची मालकी संभाळणाऱ्या कल्पना सरोज, जातीमुळे बहिष्काराला सामोरे जाऊनही'गुजरात पिकर्स इंडस्ट्रीज'द्वारे कोट्यावाढीची उलाढाल करणारे रतीलाल मकवाना;
तसेच मलकित चंद, सविताबेन परमार, भगवान गवई, हर्ष भास्कर, देवजीभाई मकवाना, हरी किसन पिप्पल, अतुल पासवान, देवकीनंदन सोन, जे. एस. फुलीया, सरथ बाबू, संजय क्षीरसागर, स्वप्नील भिंगरदेवे, या यशस्वी उद्योजकांच्या परिश्रमाची, जातीपालीअकडे जाऊन मिळवलेल्या यशाची कहाणी अनेकांना प्रेरणादायी आहे. याचा अनुवाद नमिता देशपांडे यांनी केला आहे.