Summary of the Book
नव्या व्यावसायांचे , नव्या क्षेत्रांचे आव्हान पेलायचे आहे ना? तसेच नव्या कल्पक अभ्यासक्रमांची, आवश्यक पात्रतेची आणि शुल्काची, संबंधित संस्थांचे पत्ते आणि दूरभाष क्रमांक यांची माहिती देणारे हे पुस्तक मार्गदर्शनपर आणि माहितीपर देखील आहे .
चाकोरीबाहेरच्या असंख्य अभ्यासक्रमांची, ते शिकवणा-या संस्थांची, प्रवेशपात्रतेची, परीक्षापध्दतीची माहिती संकलित स्वरूपात उपलब्ध करून देणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे.
अलीकडे देशातील काही विद्यापीठांनी बारावीनंतरचे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ते अभ्यासक्रम कोणते आहेत? या नव्या पध्दतीची वैशिष्टये कोणती आणि फायदे कोणते? त्या संदर्भातील सोयीसुविधा कोणत्या? यासारख्या विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे आता या पुस्तकात नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे ही नवी सुधारित आवृत्ती उपयुक्ततेत आणखी भर टाकणारी ठरली आहे.