Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
गेले लिहायचे राहून..
मृदुला भाटकर.
नुकतेच हे पुस्तक वाचण्यात आले. मृदुला भाटकर या मृदुला रमेश भाटकर आहेत. रमेश भाटकर या अभिनेत्याच्या त्या पत्नी आहेत. पण एवढीच त्यांची ओळख मर्यादित नक्कीच नाही. अकरा वर्षे वकिली आणि सव्वीस वर्षे न्यायदानाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे.
कोर्टाच्या आत एक वेगळच जग नांदत असते. त्याचे वर्णन लेखिकेने पुस्तकात अगदी रंजक पद्धतीने केले आहे.
आकर्षक मुखपृष्ठ हे पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. लोकसत्ता चतुरंग मध्ये मृदुला भाटकर यांनी लिहिलेल्या 25 लेखांचे संकलन या पुस्तकात आहे.
पहिल्याच प्रकरणात आपल्याला वाट चुकलेला अतिरेकी सुखदेवसिंग भेटतो. त्याची केस लेखिके कडे असते. शेवटी सुखदेव सिंगला फाशी होते. पण या सगळ्या घटनाक्रमात संवेदनशील लेखिकेची जी मनोवस्था झाली त्याचे यथार्थ चित्रण या लेखात आहे.
दुसरा लेख अप्पा या व्यक्तीवर आहे. तो हाय कोर्टात ड्रायव्हर असतो. पण तो खुप हरहुन्नरी असतो. वकील असल्यापासून ते जज होईपर्यंत आप्पाचा आणि लेखिकेचा संबंध येतो. आप्पा लेखिकेला आधीपासून एकवचनी हाक मारत असतो. त्या जज झाल्या तरी आप्पा त्यांना एकवचनी हाक मारतो. आप्पा बद्दलचा लेख वाचताना पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीची आठवण येते.
अनेक लेखामध्ये लेखिकेनी कवितेच्या ओळी समर्पक लिहिल्या आहेत.
ताबा या विषयावर त्यांनी दोन लेख लिहिले आहेत. घटस्फोटानंतर लहान मुलांचा ताबा कुणाकडे असावा या केसेस कोर्टात येतात. अशी एक अतिशय संवेदनशील केस त्यांनी लेखात सांगितली आहे. लहान मुलांची होणारी मानसिक ओढाताण पाहून आपण थक्क होऊन जातो.
दूर जाताना या विषयावर त्यांनी दोन लेख लिहिले आहेत. ते घटस्फोट या अतिशय संवेदनशील विषयावर लिहिले आहेत.
नव विवाहित जोडप्यांनी तर ते आवर्जून वाचावे असे आहेत. एका केस मध्ये समुपदेशन करताना लेखिका चक्क खोटे बोलतात, पण केसमधील गुंता सोडवतात. ते अतिशय रंजकपणे मांडले आहे.
बरेच लोक लेखिकेला विचारतात की रमेश भाटकर अभिनेते तर तुम्हाला नाट्य क्षेत्राची आवड आहे का?
रमेश भाटकर एकदा लेखिकेला म्हणाले होते की आम्ही तर नाट्य स्टेजवर जगतो. पण तुम्ही मात्र प्रत्यक्ष नाट्य जगता कोर्टात.
सुजाण वाचकांना जवळ जवळ प्रत्येक लेखामध्ये नाट्य अनुभवता येईल आणि लेखिकेच्या दृष्टीचा, संवेदनशीलतेचा परिचय होईल.
तुम्ही कोर्टाची पायरी चढला आहात की नाही माहीत नाही. पण या पुस्तकाच्या निमित्ताने मृदुला भाटकर आपल्याला कोर्टाची सफर घडवून आणतात आणि ती सफर कुठेही काळी पांढरी न दिसता सगळे रंग आपण या सफरीत अनुभवू शकतो.
श्रीधर खेडगीकर, सोलापूर.
पुस्तक: गेले लिहायचे राहून
लेखक: मृदुला भाटकर
प्रकाशक: समकालीन प्रकाशन
पृष्ठ संख्या: १३८
मूल्य: २००