Summary of the Book
माणसे अनेक क्षेत्रांत काम करीत असतात. अभ्यास, विद्वत्ता, संशोधक वृत्ती यामुळे काही जन संबधित क्षेत्रात एक उंची गाठतात. अशा काही जणांचा परिचय अ. पां. देशपांडे यांनी विद्वज्जन मधून करून दिला आहे. यातील प्रत्येकाचे कार्य महान आहे, वेगळ्या वाटेवरचे आहे. काहींचे नांव परिचित आहे, काहींची ओळख नव्याने होते. त्यांनी केलेल्या कार्याने भारावून जायला होते. नानासाहेब नारळकर, डॉ. सुरेश नाडकर्णी, वि. गो. कुलकर्णी, प्रा. भालचंद्र उदगावकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासह ३० विद्वानांची यात माहिती आहे.