Hard Copy Price:
25% OFF R 450R 338
/
$
4.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
ज्युरासिक पार्क’ या जगप्रसिद्ध कादंबरीचे लेखक मायकेलक्राइटन यांची 'डिस्क्लोजर’ही कादंबरी तितकीच चित्तवेधक आणि अंतर्मुख करणारी आहे. वैज्ञानिक पार्श्वभूमीवरच्या लेखनात - विज्ञानरंजनात रमणार्या ह्या लेखकाच्या 'डिस्क्लोजर’ ह्या कादंबरीची पार्श्वभूमी अधिक वास्तव आहे.
कॉम्प्युटरचं उत्पादन करणार्या एका कंपनीत 'डिस्क्लोजर’चं कथानकाचा रोख मात्र माणसाच्या मूलभूत प्रवृत्ती उकलून दाखवण्यावर आहे.
'डिजिकॉम’या कॉम्प्युटर कंपनीतील टॉम सँडर्स या एका अधिकार्याचा मेरेडिथ जॉन्सन ह्या वरिष्ठ स्त्री-अधिकार्याकडून झालेला लैगिंक छळ ही 'डिस्क्लोजर’ची मध्यवर्ती घटना आहे. या एका प्रक्षोभक अशा लैंगिक घटनेतून आधुनिक काळातले बदलते स्त्री-पुरुष संबंध आणि त्यातले संभाव्य धोके, औद्योगिक क्षेत्रातल्या स्पर्धा आणि ताण-तणाव, भ्रष्ट पद्धतीनं वापरण्यात येणारी सत्ता आणि तिच्या मोहानं माणसात होणारे बदल, अशा अनेक गोष्टी उलगडतात. एकीकडे वैज्ञानिक प्रगतीचा वेग तर दुसरीकडे मूलभूत प्रवृत्तींच्या संघर्षातून माणसाचंच होणारं अवमूल्यन, ह्या दोहोंतला विरोधाभास ह्या कादंबरीला एक वेगळं परिमाण देऊन जातो.
हे पैलू शब्दबद्ध करत असतानाच एका स्त्री-अधिकार्याकडून एका पुरुष अधिकार्याचा झालेला लैंगिक छळ ह्या मध्यवर्ती घटनेवरचा ताबा क्रिइटन सुटू देत नाहीत. लेखकानंच म्हटल्याप्रमाणे पुरुषानं स्त्रीचं शोषण करणं, तिच्यावर बलात्कार करणं वा तसा प्रयत्न करणं, हे अनैतिक असलं, तरी अनैसर्गिक नाही. स्त्रीकडून पुरुषावर आक्रमण झालं तर रूढ संकेतांना धक्का बसतो. काही नवीन बाजू उजेडात येतात. ह्यामुळे ही कादंबरी, विचारप्रवृत्त करणारी, जीवनक्रमासंबंधी काही भाष्य, सूत्र मांडणारी झाली आहे.