Summary of the Book
वेगळा आकृतिबंध असलेली निळू दामले यांची ‘थीज’ ही कादंबरी हे यंदाच्या ‘चंद्रकांत’चे वैशिष्टय़. एकूण सहा कादंबर्यांनी नटलेल्या या अंकात याशिवाय श्रीकांत वर्तकांची ‘आयुर्वेदाचार्य वाग्भट’, डॉ. श्रीकांत मुंदरगी यांची ‘वारीस-वाळूत उमललेलं फूल’, सुनील गंगोपाध्याय यांची ‘सत्येर आडाले’ ही मूळ बंगालीतील आणि मृणालिनी केळकर यांनी अनुवादित केलेल्या कादंबरीचा समावेश आहे. रमेश सहस्रबुद्धे यांच्या तमाशावरील अभ्यासपूर्ण चौकटी वाचकांचे लक्ष वेधून घेतात. किरण हणमशेट यांचे मुखपृष्ठ वेगळय़ा विश्वात घेऊन जाते. आसावरी बापट यांची ‘मी अपराधी’ ही कथा, तर यशस्विनी गोडसे, अरुण नेरुरकर यांचे लेख या अंकाचे आकर्षण म्हणावे लागेल.