Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
डिजिटल माध्यमांकडे फक्त एक नवे माध्यम एवढ्याच मर्यादित दृष्टीने पाहणे चूक ठरेल .ती एक स्वतंत्र आणि व्यापक व्यवस्था आहे .आशयाची निर्मिती ,स्वरूप,वितरण ,ग्राहकवर्ग ,आर्थिक गणिते ,यशापयशाचे निकष अशा अनेक बाबतीत ती वर्तमानपत्रे ,दूरचित्रवाणीसारख्या प्रसारमाध्यमांच्या व्यवस्थेपेक्षा वेगळी आहे .या माध्यमांचे वय तसे जेमतेम दोन दशकांचे ;पण त्यांच्या वाढीचे स्वरूप आणि प्रमाण चक्रावून टाकणारे आहे. प्रस्थापित प्रसारमाध्यमांपुढे तर त्यांचे मोठे आव्हान निर्माण झालेले आहेच; पण त्यांचा वापर करणारे आणि नियमन करू पाहणारे यांच्यासाठीही ती आव्हानात्मकच आहेत. म्हणूनच डिजिटल माध्यमांचे स्वरूप, त्यांची व्यवस्था आणि त्यांनी निर्माण केलेले आव्हान समजून घेणे हे माध्यमकर्मी ,अभ्यासक तसेच या माध्यमांचा वापर करणाऱ्या सुबुद्ध नागरिकांसाठी आवश्यक आहे .इतक्या समकालीन,गुंतागुंतीच्या आणि महत्त्वाच्या विषयावर '# डिजिटल पत्रकारिता 'च्या रूपाने मराठीत पुस्तक द्यावे ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे .पण तेवढ्यापुरतेच या पुस्तकाचे महत्त्व मर्यादित नाही. या माध्यमांमध्ये ज्याने प्रत्यक्ष काम केले,त्यातील बदलाचे ,वाढीचे टप्पे आतून अनुभवले अशा एका पत्रकार व्यावसायिकाने हे पुस्तक लिहिले आहे ,हे महत्त्वाचे आहे . विश्वनाथ गरुड यांच्या अनुभवसिद्धतेमुळे या माध्यमक्रांतीबद्दल अपरिचित माहिती आणि उत्तम दृष्टिकोन देण्यात हे पुस्तक अतिशय यशस्वी ठरले आहे.