81743411969788174346919B D KherB. D. KherB.D.KherBha D KherBha. D. KherBha.D.KherBiographicalBiographyBiography Of Charlie ChaplinBolka MukpatChaplinCharitraCharitratmkCharitreCharliCharlieCharlie ChaplinHasare DukhRaajhans PrakashanRajhans Prakashanचरित्रचरित्रेचरित्रात्मकचार्लीचार्ली चाप्लीनभा द खेरभा. द. खेरभा.द.खेरमायभूमीतील दिलासाराजहंसराजहंस प्रकाशनव्यक्तीचित्रणहसरे दुःख
Hard Copy Price:
25% OFF R 550R 412
/ $
5.28
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
'माझं आयुष्यच नाट्यमय आहे. तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव माझ्या चित्रपटांवर पडणारच. त्यातील सारं वास्तव मी स्वतःच अनुभवल्यामुळे माझे चित्रपट जिवंत वाटतात. नकळत मी लोकांना जीवनातलं दुःख दाखवून देतो.’ आपल्या हसर्या मुखवट्यातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणार्या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी.
चार्ली चापलीन यांनी लिहिलेल्या "माय ऑटोबायोग्राफी" या आत्मचरित्राचा हा अनुवाद आहे. आणि हे चरित्र म्हणून लिहून लेखकांनी (भा. द. खेर) स्वतःच्या नावावर का खपवले आहे?
जिथे चार्ली प्रथम पुरुषी I हे pronoun वापरतो त्या ठिकाणी... चार्ली असा म्हणाला, तसा म्हणाला... चार्लीला हे दिसले ते दिसले... असा शब्द शब्द प्रयोग करून लेखकांनी हे चरित्र स्वतः लिहिले आहे अशा प्रकारचा भास निर्माण केला आहे. हे संपूर्णतः चुकीचे आहे असे मला वाटते. त्याऐवजी त्यांनी आत्मचरित्राचा हा अनुवाद आहे असा स्पष्ट उल्लेख केला यांनी करायला हवा होता.
Ashish
16 Jan 2022 08 50 PM
अतिशय भावस्पर्शी जीवन गाथा
,
माधवी वाघ
04 Sep 2018 04 48 AM
ह्या पुस्तकामुळे मी जीवन कस जगायचं ते शिकले. शाळेत असताना घरच्या समस्यांनी त्रासून गेले असताना हे पुस्तकं माझ्या वाचनात आलं.आणि मी अक्षरशः हादरून गेले. जीवन किती विचित्र असतं आणि आपण कष्टाने, जिद्दीने त्याला किती विलक्षण उंचीवर नेऊन पोचवू शकतो, हे ह्या पुस्तकात इतक्या प्रकर्षाने मांडलं आहे की, त्याला तोड नाही. आपल्या अडचणी ह्या अडचणी नाहीतच , हे लक्षात आल्यावर जीवन किती सुखमय होतं ! ह्या पुस्तकाने मला इतक काही दिलं की, ज्याची गणतीच होऊ शकत नाही. 'मला किती दुःख आहे' अशी सतत तक्रार करणारी व्यक्ती हे पुस्तकं वाचल्यावर 'मी किती सुखी आहे' असंच म्हणू लागेल. चार्ली चाप्लिन ह्यांच्या एकेका स्मितहास्यामागे, एकेका छोट्याशा हसवणाऱ्या अंगविक्षेपामागे दडलेली अपर वेदना आणि दुःख किती विलक्षण आहे. आणि म्हणूनच त्यांनी जगाला सतत हसवत ठेवण्याचा विडा उचलला ! भा. द. खेरांनी अतिशय जिवंत व्यक्तीचित्रण लिहिले आहे. त्यांना आणि चार्लीला सलाम ..!!
Sagar Bhandare
10 Nov 2010 12 55 PM
चार्ली चॅप्लीनचे एवढ्या ओघवत्या आणि हृदयस्पर्शी भाषेत चरित्र वाचताना अनेक ठिकाणी डोळ्यांत पाणी आल्याशिवाय रहात नाही. स्वतःचे आयुष्य एक शोकांतिका असूनही जगाला केवळ आपल्या मूक अभिनयाने हसवणारा हा अभिनयसम्राट केवळ वंदनीयच नव्हे तर प्रेरणादायी पण आहे. खास करुन बालपणीच्या चार्लीची जी जडणघडण झाली आणि गरिबीने त्याला जे शिकवले ते स्थळ आणि काळ सापेक्ष असून सर्वत्र लागू होते. प्रत्येकाने वाचावेच असे हे नितांतसुंदर पुस्तक आहे. माझ्या संग्रहात एवढे सुंडर पुस्तक आहे याचा मला आनंद आहे