Summary of the Book
दोन्ही लेखक हे सध्या महात्मा फुले विद्यापीठ राहुरी येथे कृषी किटकशास्त्र विभाग अंतरंग पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्पात संशोधन सहयोगी या पदावर कार्यरत आहेत. मागील पाच वर्षापासून ते एकात्मिक कीड व्यवस्थापन या क्षेत्रात युवा तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रातील सर्व विभागातील शेतकऱ्यांमध्ये एकात्मिक किड नियंत्रण यात सल्ला देण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथून पदव्युत्तर पदवी व महात्मा फुले विद्यापीठ राहुरी येथून कृषी कीटकशास्त्र या विषयात आचार्य पदवी संपादन केली आहे. आचार्य पदवीसाठी त्यांनी द्राक्षाच्या मुळांवर गाठी करणाऱ्या सुत्रकूर्मीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर संशोधन करून प्रबंध सादर केला आहे. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जवळपास पंधरा शोधनिबंध, दोन पुस्तके व दीडशेच्या वर मराठी लेख प्रकशित झालेले आहेत. कीटकनाशकांच्या सुरक्षित हाताळणीबाबत अहमदनगर आणि पुणे जिल्हातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले आहे. पिकांवरील किड रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्पाअंतर्गत १० जिल्हातील शेतकरी बांधवांना किड नियंत्रणाबाबतीत ते दर सोमवारी आणि गुरुवारी सल्ला देत असतात.
त्याचसोबत कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन कामगिरीसाठी त्यांना विविध संस्थांकडून 'युवा सांशोधन, 'उत्कृष्ठ लेखक' व महाराष्ट्र विभूषण' या पुस्तकारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर करून 'होय आम्ही शेतकरी' या समूहामार्फत व्हॉट्सअप, फेसबुक, कृषिकिंग, अँप, टेलिग्राम, द्वारे लाखो शेतकरी जोडले आहेत.