Hard Copy Price:
25% OFF R 225R 169
/ $
2.17
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
आपल्या वंशवेलीवर टवटवीत, सुगंधी फुले यावीत अशी आकांक्षा बाळगणार्या सर्व नवविवाहितांसाठी आवश्यक असे हे शास्त्रीय दृष्टीकोनातून गर्भधारणेच्या नियोजनाची माहिती देणारे सर्वाधिक खपाचे पुस्तक!
बाळाचा जन्म आणि त्याचे संगोपन हा स्त्रीच्या आयुष्यातील आव्हानत्मक भाग असतो. हे आव्हान सोपे व्हावे, यासाठी डॉ. मालती कारवारकर या पुस्तकातून मर्गदर्शन करतात. उत्तम संततीसाठी गर्भवतीचा आहार कसा असावा, वजन आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, गर्भधारणेच्या सुरवातीच्या दिवसांत काळजी कशी घ्यावी, गर्भधारणा आणि निसर्ग यांचा संबंध काय आदी विषयांवर लेखीकेने सुयोग्य उदाहरणांसह मार्गदर्शन केले आहे.
डोहाळ्यासंबंधी समजुती, गैरसमजुतींविषयीही माहिती दिली आहे. बाळाचा जन्म झाल्यावर पहिले सहा महिने फक्त दुधारवर भर द्या, असे त्या म्हणतात. बालकाची काळजी कशी घ्यावी, बाळकडूचा खरा अर्थ या संदर्भात पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे. या शिवाय मूक - बधीर, अपंग, अंध आणि मतिमंद यांच्या आहार आणि गरजांची विस्तृत माहिती हे पुस्तकाचे वैशिष्टय आहे.
हे एक अतिशय माहितीपूर्ण पुस्तक आहे. मी हे पुस्तक गेली 30 वर्षे नवीन जोडप्यांना भेट म्हणून देतो आहे. आत्तापर्यंत मी जवळजवळ 50 च्या वर पुस्तके भेट म्हणून दिली आहेत आणि देत राहीन.
Aradhana Subhash Ghatol
08 Feb 2023 11 34 PM
हे पुस्तक सर्वांच्या घरी असले पाहिजे. लहानपणापासून मुलांचा आहार चांगला झाला पाहिजे. मालती कारवारकरांनी खूप मेहनत घेऊन हे पुस्तक लिहिले आहे त्यांची इतरही पुस्तक खूप सुंदर आहे त्याचा लाभ सर्वांनी घेतला पाहिजे. आहार कसा असला पाहिजे असा विषय लहानपणापासून शाळेत शिकवला गेला पाहिजे.
Manjiree V. Sharam
13 Sep 2011 11 55 PM
Totally Worth reading Vanshvel! Everyone should read it!