Hard Copy Price:
15% OFF R 200R 170
/ $
2.18
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
ती जन्माला आली. मरता-मरता वाचली. मग तिचं एक-एक व्यंग कळत गेलं. त्यातलं सर्वांत मठं- दृष्टिहीनता. मग सुरू झाल्या अडचणींच्या डोंगरामधल्या अंधारवाटा! ना ती डगमगली. ना तिचे आई-वडील-बहीण हरले. डोळ्यांना पट्टी बांधून जिद्दीनं संसार करणार्या गांधारीइतकंच तिचं काळखं विश्व समजावून घेणारी खबीर आई. आणि तिच्या अथक साथीन मनश्रीनं घेतलेली उत्तुंग भरारी- ती कहाणी आहे ’मनश्री अनिता सोमण’ या ’दृष्टिहीन’ मुलीच्या ’नेत्रदीपक’ यशाची.
मनश्री सोमण. जन्मतः च दृष्टिहीन. देव सुद्धा अशा काही चुका करतो कि मानवाचं science ही त्या सुधारू शकत नाही. आठव्या महिन्यातच जन्माला आली ती. premature, with cleft lips, न जुळलेल्या vertebrae मुळे जन्मतः च आखूड मान,… तिला जन्म दिलेल्या तिच्या माउली वर काय आघात घडले असतील तीच जाणो.
अशा सगळ्या दिव्यातून मनश्री 'जगली', खर आयुष्य जगली. स्पर्शातून तिने जग 'पाहिलं'. एवढ असूनही ती म्हणते - "आपण किती 'लक्की' आहोत कि इतरांना विचारत - विचारत, हाताच्या अंदाजाने आपल्याला चालता तरी येतय." प्रत्येक गोष्टीत तक्रार करणाऱ्या डोळस माणसांनी शरमेने मान खाली घालावी, असा तिचा 'दृष्टीकोन'.
खरतर तिच्या प्रत्येक यशात खरा वाटा तिच्या आई-वडिलांचा तसेच बहिण आणि आजी-आजोबांचा पण आहे. त्यांनीच तिला स्वतः च्या पायावर उभं राहायला, त्यांच्या दृष्टीतून जग पाहायला शिकवलंय.
अशा या 'बालश्री' मिळवलेल्या मनश्री ची कहाणी वाचताना थक्क व्हायला होतं, ऊन - पावसाचे खेळ वाचकाच्या चेहऱ्यावर दिसतात. आणि मनश्री चं आवडतं गाण आपल्या कानात गुणगुणू लागतं -
'या जन्मावर, या जगण्यावर…
शतदा प्रेम करावे…. '