Summary of the Book
मंगेश पाडगावकर यांचे नांव डोळ्यांसमोर आले तरी त्यांच्या कविता आजही ओठावर येतात. कविता आणि तिची निर्मितीप्रक्रिया याविषयी त्यांनी केलेले विचार 'शोध कवितेचा' मधून एकत्रित केले आहेत. स्वतःच्या लेखनाविषयी तटस्थपणे पाहात लेखनामागची प्रेरणा, निर्मितीप्रक्रिया, साहित्यकृतीचा आस्वाद यांविषयी त्यांनी लिहिले आहे. यातून कवी मंगेश पाडगावकर यांची वेगळी ओळख होते, तसेच यात त्यांनी केलेल्या भाषणांचाही समावेश आहे.