Summary of the Book
श्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे. विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही यवनांच्या आक्रमणाला यशस्वीपणे थोपवून हिंदू धर्मरक्षणासाठी हिंदू साम्राज्याची स्थापना करणे, हा मोठा चमत्कारच त्यांनी केला आहे.
या चरित्रात श्रीपादांचा जन्म, मुंज, अनेगुंडीचा महायज्ञ, इस्लामी जन्भासुर अशी स्वतंत्र प्रकारणे आहेत. त्यानंतर माधव हरिहर बुक्क भेटीसह विजयनगरच्या हिंदू साम्राज्याची स्थापना असे टप्पे येतात. माधव म्हणजेच विज्ञारण्यस्वामी. श्रीपादांनी त्यांना शृंगेरी पीठाचे शंकराचार्य केले. श्रीपादांबरोबरच त्यांचेही कर्तृत्व समजते.