Summary of the Book
मराठी साहित्यविश्वात पोलिस तपासकथा रुजवल्या त्या कै. श्रीकांत सिनकर यांनी. त्यानंतर अनेकांनी असा प्रयत्न केला. चारुदत्त बागूल हे त्यापैकी एक ठळक नाव. पोलिस अधिकाऱ्यांशी बोलून संबंधित घटनेची सविस्तर माहिती घेऊन बागूल यांनी या कथा लिहिल्या आहेत.
पैसावसुली, किरकोळ चोऱ्या आणि दरोडेखोरीसारखे मोठे गुन्हे अशा सर्व प्रकारच्या तपासकथा यात आहेत. बागूल यांच्या शैलीमुळे त्या वाचनीय झाल्या आहेत.