Summary of the Book
बालवयात वाचनाची सुरुवात करून देताना पुस्तकांतल्या गोष्टींइतकंच महत्त्व आतल्या चित्रांना, व्यक्तीचित्रांच्या हावभावांना, त्यात वापरलेल्या रंगांना आणि रचनेलाही असतं. हो ना?
'गुणीसोबत शिकूया' ही अशीच एक चित्र-कथुल्यांची मालिका आहे, जी आपल्या मुलांना मराठी वाचनाची गोडी लावेल, रुजवेल आणि वाढवेलही..
'घरी येणारी माणसं' हे या मालिकेतील पहिलं पुस्तक. यामध्ये कामवाली मावशी, रद्दीवाले काका, कुरियर दादा अशा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनून जाणाऱ्या व्यक्तींची ओळख करून देणाऱ्या गोष्टी आहेत. कमीत कमी शब्दांत, चित्रमय स्वरूपात, आपल्या आजच्या पिढीचं जग त्यांच्या समोर ठेवायच्या आमच्या प्रयत्नात तुम्ही आमची साथ द्याल ना?गुणीसारख्याच हुशार , चुणचुणीत , उत्साही , उद्योगी आणि जिज्ञासू मुला -मुलींच्या अथक प्रश्नांना आपल्या मराठीतून उत्तर देणारं पुस्तक आहे हे ! शहरांमध्ये किंवा cosmopolitan communities मध्ये राहूनसुद्धा आपली मुलं नक्कीच मराठी बोलू शकतात . आपण त्यांच्याशी बोलूया आणि अशी मराठी पुस्तके वाचून दाखवूया.