Hard Copy Price:
R 120
/
$
2.70
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
तारिक असलं 'तस्नीम' हे बिहारमधील तरुण, उमदे लेखक. लहानपणी आजोबांकडून ऐकलेल्या, राजे-राण्यांच्या, प-यांच्या लांबच लांब कहाण्या आणि पुढच्या काळात फुटपाथवरच्या आणि ग्रंथालयातील पुस्तकांनी त्यांच्या मनाचं पोषण केलं. जीवनात अनेकानेक अनुभवांचं खत-पाणी जसं पडत गेलं. तसं लहानपणी मनात पेरलेलं कथांचं बियाणं तरारून उगवून आलं. आपल्या अवती-भोवती डोळसपणे, सतर्कतेने पाहणारा आणि सामाजिक बांधिलकी मानणारा हा लेखक आहे. व्यक्तीच्या वृत्ती-प्रवृत्तीतील, आचार-विचारांतील विसंगती, त्यांना नेमकेपणाने जाणवते आणि त्याचं मार्मिक रेखाटन ते आपल्या कथांतून करतात. जिथं जिथं व्यक्तींचं पतन, चारित्र्याचं स्खलन, अगतीकाचं शोषण झालेलं दिसतं, तिथं तिथं त्यांची लेखणी सरसावून लिहिती होते, तिखट आणि धारदार होते. तरीही, त्यांच्या सगळ्या लिखाणाला कारुण्याचा एक पारदर्शक पदर जोडलेला दिसतो.