Summary of the Book
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या निवडक अविस्मरणीय भाषणाचं विचारचं सोनं. शिवसेनाप्रमुखांची भाषणं हा शिवसैनिकांसाठी नेहमीच एक अमुल्य असा ठेवा राहिला आहे. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या विचारांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगात मराठी माणसाला स्वाभिमानाचा मंत्र दिला. आणि मराठी माणसांवर होणारे अत्याचार, धाक, दडपशाही मोडीत काढण्याची ताकद दिली. शिवसेनाप्रमुखांची वाणी आणि लेखणी ही मराठी माणसासाठी नेहमीच दीपस्तंभासमान कार्यरत राहत आली आहे. त्यांनी दिलेलं विचारांचं सोनं आपल्या जीवनात कायमस्वरूपी मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहणार आहे.