Summary of the Book
१९८७ साली ‘चिन्ह’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. पहिल्याच अंकाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘दीनानाथ दलाल पुरस्कार’ मिळाला. पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर यांसारख्या असंख्य नामवंतांचं कौतुक ‘चिन्ह’ला पहिल्या पदार्पणातच लाभलं. पहिल्या तीन अंकांनंतर १९८९ साली ‘चिन्ह’चं प्रकाशन थांबलं आणि तब्बल बारा वर्षांनंतर म्हणजे २००१ साली ते सुरू झालं. दुसर्या पर्वातल्या एकाहून एक अशा विलक्षण विषयांवरच्या अंकांनी मराठी वाचकांना मोहित करून टाकलं. पण त्याचबरोबर १९८७/८८/८९ सालच्या पहिल्या पर्वातल्या तीन अंकांनाही वाचकांकडून विचारणा येऊ लागली. पण ते अंक संपून गेल्यामुळे ती मागणी पूर्ण करणं ‘चिन्ह’ला शक्य झालं नाही. त्यातूनच ‘निवडक चिन्ह’ या संकल्पनेचा जन्म झाला. या पहिल्या पर्वातल्या तीन अंकामधील निवडक लेखांचं संकलन म्हणजेच ‘निवडक चिन्ह’ होय. ‘चिन्ह’च्या पहिल्या पर्वातले लेख आज तब्बल २४ वर्षांतही जुने अथवा शिळे झालेले नाहीत. हेच ‘निवडक चिन्ह’नं सिद्ध केलं आहे. म्हणूनच ‘निवडक चिन्ह’ची दुसरी आवृत्ती ई – बुक स्वरूपात प्रसिद्ध केली जात आहे. आता जगभरात पसरलेला मराठी वाचक ‘चिन्ह’च्या या ‘अक्षर’ आवृत्तीचा जगभरात कुठेही बसून आस्वाद घेऊ शकेल.