Summary of the Book
करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या लेखांचा हा संग्रह. मात्र केवळ विविध अभ्यासक्रम किंवा रोजगारविषयक शिक्षण देणाऱ्या संस्थांचे पत्ते किंवा अभ्यासक्रमांची माहिती देणारं हे पुस्तक नाही. विलास गावरसकर यांनी अशी कुठलीही यादी किंवा पत्ते न देता वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची आणि वेगळ्या क्षेत्रांत कसं करिअर करता येईल, अशा बाबींबद्दल माहिती दिली आहे. हे करताना त्यांनी विद्यार्थ्यांना नेमकं मार्गदर्शन केलं आहे. विविध उदाहरणं देत तुमचा कल कशात आहे ते आधी ओळखा, असं सांगितलं आहे. संधी नेमक्या कशा ओळखायच्या आणि त्यासाठी आपली तयारी काय हवी, याबद्दल मुलांना मार्गदर्शन करताना गावरसकर यांनी समर्पक उदाहरणं देत मुलांचा उत्साह वाढेल अशी माहिती दिली आहे.