Hard Copy Price:
25% OFF R 200R 150
/ $
1.92
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
गावाचे चित्र म्हटले की एक घर, जवळून वाहणारी नदी, पाठीमागे डोंगर, आकाशात उडणारे पक्षी हटकून दिसत असे; पण गावचे शहरीकरण होऊ लागले, ग्रामविकासाच्या नावाखाली ग्रामसंस्कृतीचा विसर पडला अन गावचे गावपण हरवले. अशा गावांच्या, गावकऱ्यांच्या गोष्टी अरविंद जगताप यांनी हो‘गोष्ट छोटी डोंगराएवढी!’मधून सांगितल्या आहेत. कोळेवाडीतील जनार्दन हा नाचकाम करणाऱ्या रेखाचा मुलगा. सैन्यात असताना दहशतवाद्यांचा खात्मा करताना तो धारातीर्थी पडतो. त्याची जात माहित नसल्याने कोणत्या जातीच्या स्मशानात त्याच्यावर अंतिमसंस्कार करायचे, हा प्रश्न ‘अमर राहे!पण कुठे’ या कथेतील गावकऱ्यांना पडतो. ‘सोनामावाशी’चे लग्न झाल्यावर पाऊस पडल्याने तिला बायका देवी मानायच्या. पतीच्या मागे तिने आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले; पण मुले मात्र नोकरीनिमित्त शहरात गेल्यानंतर आईला विसरले. गावातील राजकारणाचा बळीचा बकरा ठरलेला शंकर घाडगे, आमदारांचा राइट हँड असलेल्या दीप्याचे भवितव्य, स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या विन्याने मैत्रिणीला सन्मार्गावर आणण्यासाठी लढविलेली ‘स्मार्ट’ शक्कल, अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमधून डोंगराएवढा आशय समोर येतो.
ग्रामीण भागातील आजचं खरं चित्र डोळ्यासमोर उभं करणारं पुस्तक. आजी नातवाला सांगते तश्या थेट आणि
सोप्या शैलीत आहेत या गोष्टी. वाचनाऱ्याला गुंतवून ठेवतात. गोष्टी आकाराने लहान असल्या तरी आशय मोठा आहे. वाचून संपल्या तरी ह्या गोष्टी मनात मात्र सुरू राहतात. रेंगाळत राहतात. नक्की वाचा.