Summary of the Book
‘भारतीय धर्म व्यवहार कोश’ या प्रस्तुतच्या पुस्तकात (कोशात) तिथी, वार, नक्षत्र, ग्रह, ग्रहपीडा व उपाय, महिने, योग, शुभ-अशुभ वेळ, पत्रिका, देव, पूजा, व्रते, खरेदी-विक्री, रोग, स्वप्ने, हिंदुधर्म, चातुर्वर्ण, चार आश्रम, जन्म संस्कार, उपनयन, विवाह, संतती, गाय, मृत्यू, प्रेतकर्म, श्राद्ध-विधी अशा प्रकारची व्यवहारातील बरीच माहिती इतर ग्रंथांवरून कोशरूपात संकलित केली आहे.
हल्लीच्या धावपळीच्या, यंत्रयुगातील राहणीमुळे आपली मन:शांती ढळते. सर्व जगात वातावरण नेहमी प्रक्षुब्ध असते. हे सर्व टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे या कोशात दिलेल्या शक्य तितक्या गोष्टी आचरल्या तर मन:शांती लाभेल असे वाटते. प. पू. पांडुरंगशास्त्री आठवले, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव, दत्तात्रेय कवीश्वर आदी मान्यवरांचे अभिप्राय या कोशात समाविष्ट केलेले आहेत. या भारतीय व्यवहार कोशाचे महत्त्व त्यांच्या अभिप्रायांतूनही उत्तमपणे व्यक्त होते.