Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
प्रसारमाध्यमे, मासिके, दिवाळी अंक यामधून विविध विषयांवरील लेख प्रसिद्ध होत असतात. 'युनिक फिचर' या फिचर एजन्सीने सामाजिक विषयांची सखोल माहिती घेऊन अनेक लेख लिहिले. अनेक दैनिके, दिवाळी अंकात १९९१ ते २०११ या काळात ते प्रसिद्ध झाले. त्यातील निवडक महत्वाचे लेख 'शोधा खोदा लिहा' या पुस्तकातून संग्रहित केले आहेत.
शोधलेख, रिपोर्ताज, सर्वेक्षण, गप्पा-लेख अशा वर्गीकरणात हे लेख वाचायला मिळतात. पुरोगामी महाराष्ट्रात दलितांवरील अन्याय उघडकीस आणणारा 'गाव एकच, पाणवठे, खेड्यापाड्यातील एकशिक्षकी शाळेची दैना, गायरान जमिनींचे वास्तव, कॉंग्रेसची देशातील पीछेहाट व महाराष्ट्रात मात्र आशादायक स्थिती, स्त्रियाना मंदिरात प्रवेशबंदी,नव्या व निष्प्रभ कामगार संघटना, पोलीस दलाची स्थिती,
शहरीकरणात नद्यांचे अस्तित्व, एन्रॉनची लढाई, वृत्तवाहिन्यांची टीआरपीसाठी काहीही करण्याची तयारी, पैठणीचा वैभवशाली वारसा सांगणाऱ्या पैठणचे फिसकटलेले व्यावसायिक गणित, शेतीवाडीशी निगडीत गावाचे झालेले आयटी जंक्शनमधील रुपांतर, महाराष्ट्रातील पाणीटंचाई, विदार्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा विविध विषयांवरील अभ्यासपूर्ण लेखांमधून गेल्या पाव शतकातील समाजाचे दर्शन घडते.