Summary of the Book
आणि त्याचवेळी मला अगदी
माझ्याजवळ सावली देवीचे
खदखदा हसणे ऐकू आले होते.
घराच्या चारी कोपऱ्यातून शंखाचा
झांजाचा आवाज ऐकू येऊ लागला
होता. आणि मला साद ऐकू आली,
'चल लवकर ये ऽ मला भूक लागली आहे .'
हा सर्व कोलाहल त्या आमच्या खोलीत
एवढा वाढला की मला ते सर्व सहन होईना .
वाटले आता माझे डोके फुटून त्याच्या
चिंधड्या चिंधड्या उडतील.