Summary of the Book
अष्टावक्र गीता (अष्टावक्र संहिता) हा मिथिला नरेश राजर्षी जनक व अष्टावक्र यांच्यातील संवाद म्हणजे अद्वैत वेदान्तावरील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. २० प्रकरणे आणि २९९ श्लोकांची ही गीता भगवद्गीतेएवढी प्रसिद्ध नसली तरीही वेदान्ताविषयीचा प्रकरण ग्रंथ म्हणून ही गीता विद्न्मान्य आहे.
शं. बा. मठ संस्कृतविषयक ग्रंथाचे भाषांतरकार व विवरणकार म्हणून सुपरिचित आहेत. अष्टावक्र गीता हा त्यांची नवी कृती मूळ संस्कृत श्लोक, त्यांचा अर्थ व विवरणासहित आहे. सोप्या मराठी भाषेत श्लोकार्थ स्पष्ट करून सांगितल्यामुळे मूळ संस्कृत न समजणाऱ्यालाही पुस्तक सारांशरूपाने समजू शकते. विवरणात दृष्टांत व उदाहरणांद्वारा श्लोकाचा अर्थ स्पष्ट केल्यामुळे वेदान्तातील कल्पना सुगम होतात.