Summary of the Book
चित्रपट हे माध्यम मूलत: कॅमेर्याचं, जसं नाटक हे माध्यम शब्दांचं. परंतु होतं काय की आपल्याकडे अनेक चित्रपट जसे बोलके झाले तसे यामाध्यमाकडे नाटकांकडून माणसे वळली गेली आणि त्या बोलक्या झालेल्या चित्रपटांचे बडबडयुक्त चक्क बोलपट झाले.
बोलपटांची पल्लेदार संवादांनी ठासून भरलेली ही व्याख्या शब्दार्थाबरहुकूम आपल्या देशात इतकी रुळली, पक्की झाली की आपल्याकडचे तथाकथित बोलपट पाहताना आपण जणू काय सिनेमाच्या पडद्यावरील एखादे नाटकच पाहतो आहोत की काय असं वाटायला लागतं. सिनेमा ही कॅमेर्याची भाषा; नव्हे ती तशी असतेच ही गोष्ट आपल्याकडील बहुसंख्य चित्रपट-दिग्दर्शक पार विसरून गेले आहेत असं वाटतं.
प्रस्तुत पुस्तकात सिनेमासृष्टीतील झगमगाट व चढउतार त्याबरोबरच तांत्रिक अंगांचाही प्रामुख्याने विचार केला गेल्याने केवळ गंमत म्हणून वाचून सोडून देण्यापेक्षा सिनेमासृष्टीचे अंतरंग जाणून घेण्यास चांगलीच मदत होते.