Summary of the Book
'खाणे, पिणे, स्नानासाठी वापरा ऑक्सिजन!', 'कृत्रिम डोळे', 'सडपातळ होण्याची फॅशन', घाम गाळा, बल्ब पेटवा,' 'आपले केस पांढरे का होतात,' 'हृदयासाठी लाभदायक गायन,' 'शिफ्टमध्ये काम केल्याने आयुष्य घटते, ' 'बुद्धिमत्तेच्या जीन्सचा शोध,' अशी आरोग्यविषयक माहिती आणि सल्ले या पुस्तकात मिळतात.
रमेश महाले यांनी या पुस्तकात आरोग्यासंबधीचे विविध विषय हाताळले आहेत. 'इंटरनेटशी प्रेम आरोग्याशी खेळ,' 'सावधान! समुद्राचे पाणी तेजाबी होत आहे,' 'बुजुर्गांसाठी कठीण काळ,' असे धोक्याचे इशारेही ते छोट्या छोट्या प्रकरणांमधून देतात.
किसमिस, वाईन, मासे, बेडूक अशा घटकांचे फायदे - तोटेही पुस्तकातून समजतात. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि पाळल्या तर आपण आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो, असे महाले यांनी पुस्तकात म्हटले आहे.